बुधवार, 29 मार्च 2017

मानुसकीची 'ती'

सकाळी अकराची वेळ. सविञीबाई फुले विदयापीठाच्या हिंदी विभागात तडक निघालो.आदरणीय डॉ.सदानंद भोसले सरांनी एम.फिलच्या विषयांवर बोलण्यासाठी बोलावलं होतं. केबीनच्या दारातून आत डोकावलं तर आत सर वाचत बसले होते. आदबीने आतमध्ये जाऊन बसलो.'दलित सौंदय्रशास्ञावरती बोलणं चालू झालं. मध्येच काही वेळाने सरांचा मोबाईल वाजला. पलिकडून डॉ.बाळासाहेब सोनवणे बोलत होते. ते ओपन कँन्टिन जवळ आले होते. त्यांना आत या. असं सरांनी सांगितल आणि आम्ही पुन्हा बोलण्यात मग्न झालो. तेवढ्यात डॉ.सोनवणे ही आले. नकळतपणे तेही आमच्या बोलण्यात सामील झाले. आमचं बोलणं दलित सौंदय्रशास्ञाहून आत्मकथा,दलित महिला प्रश्न,वास्तविकता,गरज अशा अनेक पैलूने पुढे-पुढे जात होती. तेवढ्यात सरांच्या केबीनचा दरवाजा आत ढकलत पन्नाशीतील एक महिला येऊन समोर उभी राहिली. डॉ.भोसलेनां तिनं प्रश्न केला.'ओळखिलं का सर मला?'
सरांनी काही वेळ विचार केला पण 'त्या' महिलेची ओळख काही पटेना.
मग त्याचं महिलेनं पुढाकार घेतला. अन् सांगितल की,' मागच्या महिण्यात नाय् का सिकीरीटीसाठी तूमी आमच्या मुलाखती घेतल्या होत्या.त्यात मी पऩ होते.तुमचयामुळं मी सिलेकट झाले.मनून आले भेटायला'.मी सोलापूरची हाय महनून तुमच्यासाठी मुद्दामहून 'सोलापूरी शेगदाण्यांची चटणी' आणली हाय.
असं म्हणत 'त्या' महिलेनं 'तिखट' पण 'गोड' भावनेनं आणलेल्या चटणीचा पुडा डॉ. भोसले यांच्या हातात दिला. मी आणि डॉ. सोनवणे माञ आवक झालो.'त्या' महिलेला माञ फार मोठं समाधान वाटत होतं.
डॉ. भोसले यांचा मिश्किल स्वभाव असल्याने ते 'त्या' महिलेस म्हणाले.' नुसती चटणीचं का?भाकरी कुठ हायत्या? त्यांच्या या प्रश्नावर ती महिला व आम्ही खळखळून हसलो.
'भाकरी पुढच्या वेळेस आणिन'.
असं म्हणून 'ती' महिला निघून गेली.
शिकलेली माणसचं शहाणी असतात. कमी शिकलेल्यानां शहाणपण नसतं. मोठमोठ्या 'पदव्या' घेतल्या म्हणजे खुप काही कळतं. असा 'गोड गैरसमज' आजही मानला जातो.
जागतिकीकरणामुळे जग जवळ आलं.पण माणूस दूर गेला.असा विचार लेखक व साहित्यीक नेहमीच मांडतात.पण अशा असंख्य प्रश्नानां हि घटना म्हणजे एक सुखद  चपराक होती. पदवी मिळाल्यावर आपल्या मास्तरांना आपण साधं भेटत सुध्दा नाही. आत्मकेंदरी झालेली आजची विद्याथी पिढी. कृतघ्न राहात नाही.अशा मानवी जीवन मुल्ये हरवलेल्या काळात 'ती' महिला संस्कार, संस्कृती,पंरपरा,मुल्य,स्वभिमान,माणुसकीचा 'झरा' वाटली. तीनं 'मानवतेची' पेरणी केली होती.
आम्ही सहजपणे पाहिलं तर डॉ. भोसले ही सदगदीत झालेले दिसले. उच्च पदव्या घेऊन साहित्याच्या गप्पा मारणार्या,आम्हालाचं खुप कळतंय अस दाखविणार्या,मोठेपणात वावरणार्या,लोकांना हा ठेवा जपता येईल का? याचा विचार मी आणि डॉ. सोनवणे करत होतो.तेवढयात 'चहाला चला' या डॉ.भोसले सरांच्या आवाजाने आम्ही भानावरती आलो. तिघेही उठलो.ओपन कँन्टिनकडे 'चहा' पिण्यासाठी निघालो.पण मी माञ त्याच विचारात होतो.मग मला सहजचं आठवलं. सासवडला(पुणे) आचाय्र प्रल्हाद अञेंची समाधी आहे.त्यावर लिहंलयं. "हा माणूस अविवेकी असेलं. हा माणूस बदमाष असेलं. पण हा माणूस कृतघ्न कधीचं नव्हता.....!!!!zombadedhanu98@gmail.com