बुधवार, 30 दिसंबर 2015

संवेदना जिवंत असणारी माणसं....

हल्लीचा काळ म्हणजे संगणकाचा. माध्यमांसाठी तर टि.आर.पी.युग. हातातल्या 3G,4G,GALAXY न मानसांच्या संवेदना सुध्दा 'बोथट' होत असताना संवेदना जिवंत असणारा 'माणूस' मिळण अवघड. पण संताची पंरपरा असणार्या याच महाराष्ट्रात दोन खरीखुरी 'माणस' पुढं आली. आणि कृषीप्रधान भारताच्या महाराष्ट्रातील 'बळीराजाच्या' मदतीला धावून आली. होय खरं हाय....ती दोन जिगरबाज माणसं म्हणंजी...सिनेअभिनेते  नाना पाटेकर व मकरंद आनासपुरे होय.
कोणतीही संस्था किंवा बँनर नसताना केवळ मी माणूस आहे, म्हणून मला समोरच्या माणसासाठी माझ्या परीनं काहीतरी करायचंय. हि 'माणुसकी'ची भावना ठेवून सुरू केलेल्या या कामाचा 'डोलारा' दिवसेंदिवस वाढत आहे. समाजाच्या 'दातृत्वानं' त्यांना आणि त्यांच्या उपक्रमाला महत्त्वाचं मानलं. यातूनच काहीतरी बँनर असावा म्हणूनचं "नाम" ची स्थापना झाली. मग यात पण गंमत अशी आहे कि, नाम मधील ना म्हणजे नाना व म म्हणजे मकरंद असा साधा साेपा भाग. आता या कामानं जगभर झेप घेतलीय. नानांनी काल बोलक्या व तरूण मंञ्याच्या भागातील म्हणजे विद्रभातलं एक गाव.तर खंडीभर नेते असलेल्या मराठवाडयातील एक गाव अशी दोन गाव 'दत्तक' घेतलीत.
काल औरंगाबाद(अजून नामांतर झालं नाही म्हणून) मध्ये नामला आलेल्या निधीची व भविष्यातील नियोजनाची सविस्तर माहीती दिली.
नानांनी बोलताना 'आभाळचं रूसलंय  त्याला आपण तरी काय करणार?पण हिमतींनं लढा देऊ.माझ्या भावानों आत्महत्या करण्या अगोदर एकदा मला फोन करा. घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. अशी भावनिक साद घातली. या दोघाचं आणखी एक वेगळेपण नमूद कराव लागेल की हि मदत करताना त्यांचे पाय जमिनीवरचं आहेत.नाना व मकरंद दोघे मदत देताना पाया पडून मदत करतात? काल तर नानांनी चक्क विनंती करून सांगितल की," आम्हाला दैवत्व बहाल करू नका"?
आता हे सगळं तुम्हाला माहीत असताना लिहीण्याचा उपद्रव कशाला असा खोचक प्रश्न 'स्मारट फोन' घेऊन सतत जगाच्या सोबत असणार्या माझ्या 'जाणकार' मिञांना पडेल? तर लिहण्याचा अट्टाहास एवढ्यासाठीच की, आपण विचार केला पाहिजे नाना व मकरंद काही आमदार किंवा खासदार नाहीत 'गाव' दत्तक घ्यायला? पण ती खरं म्हणजे "लोकनेते" आहेत. माञ समाजाचा 'करंटेपणा' असा की, काल परवाच्या 'आदरश' लोकंना आम्ही 'लोकनेता' म्हणून मिरवत असतो. आम्हाला दैवत्व बहाल करू नका? अस म्हणार्या नानाचा गुण घेऊन गल्लीपासून दिल्लीप्ररयत 'नेता' म्हणून मिरवणार्यानं जगलं पाहिजे. हजार दोन हजाराच्या 'डिजीटल फेलेक्स'वरती गावगुडांची टोळी चौकात उभी करून स्व:ताचा 'उदोउदो'करणारांनां नानाच्या वाक्यानं 'चपराक' मिळाली आहे. 'फेलेक्स संस्कृतीत' भाग्यविधाते,विकासपुरूष,तरूण,तडफदार,लोकनेता,आदरणीय,वंदनीय,लाडके नेते,समाजसेवक,गोरगरिबांचे कैवारी,आबा,दादा,भाऊ,आण्णा,अशी गुळगुळीत बिरूद वापरून प्रसिध्दीचा आव आणणार्या समोर या दोन रंगभुमीवरील पैलवानानी 'तगडं आव्हान' उभं केलंय. सगळ्यात म्हत्वाचं म्हणजे सोशल नेटवरकींगवर like,good,Chan,fine,nice अशा बाजारू कमेंन्टस करणारे आपण 'सरकार'(शासनाला व मंञ्यांना) 'ग्लोबल विल्हेज' मध्ये "शहाणपणा शिकवत असतो. पण एवढं करूनही नाना व मकरंद दोघे 'सरकार विषयी आम्हाला काही बोलायचं नाही'?  असं म्हणतात. नाना तर त्याच्या पुढं जाऊन म्हणताे की, सरकारला काही सांगण्या इतका मी मोठा नाही?
याच आत्मपरीशण आपण केलं पाहिजे. बीड,लातूर,उस्मानाबाद,अमरावती,
चंद्रपूर मधील शेतकर्याना नाना व मकरंद मदतनिधी वाटत होते. तर दुसरीकडे 'बिहारच्या रणसंग्रामात' पँकेज जाहीर केलं जात होतं. यालाच म्हणतात " अच्छे दिन"?
नाना व मकरंद नंतर पुढे सरसावलेल्या अजिंक्य रहाणे,अशय कुमार,पंढरपूर संस्थान,झी२४तास,मी मराठी याचंही कौतुक करावचं लागेल. चिञपटात पैशासाठी हासलं आणि रडलं जातं. असा आपला आजही समज आहे.पण चिञपट 'माणूस' व्हायला शिकवतो.हे या दोन "अस्सल नायकांनी" दाखवून दिलंय.
आपणाला आठवत असेल काही दिवस आधी मंकरदचा "गोष्ट छोटी डोंगराएवढी" या चिञपटातील न्यायालयात त्याने न्यायधिशांसमोर केलेला संवाद खुपचं गाजत होता. त्यात मकरंद म्हणतो 'उद्या दोन रूपये गव्हासाठी हा देशचं गहाण ठेवालं'? या प्रश्नाला त्याला अजूनही 'उत्तर' सापडलेलं नाही. म्हणून तो उत्तराच्या शोधात चिञपटातील 'जिवंत संवेदना' घेऊन काम करतोय.तर दुसरीकडं नानाचा 'देऊळ' आठवत असेल.त्यामध्ये आण्णा(दिलीप प्रभावळकर) ला समजावताना नाना म्हणतो, आम्हाला मान्य हाय विकासाच्या नावावर जे काय होतय ते चागलं नाही.रूग्णालयाचा पैसा मंदीरावर झालाय.पण आम्ही तरी काय करणार आण्णा? शहरांनी फक्त सुधरावं अन् खेडयानं माञ तसचं ऱाहावं. इथं प्यायला पाणी नाही,शाळा नाही,रस्ता नाही,साला वीज नाही.कालचा कारयक्रम रिपीटचं बघावा लागतोय कि आण्णा? कारण काय तर लाईटच नाही'?...... नानांच्या संवादातील हि आगतिकता शोधण्यासाठी त्यानं औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातलं 'धांदलगांव' निवडलंय.आणि धांदलगांवची धांदलचं उडालीय.गेल्या वरशी टि.व्ही आणि वृत्तवाहिनींवर एक जाहिरात खुपचं गाजली.त्यामध्ये वेगवेगळी पाञ.पण सगळेचं एकचं प्रश्न विचारायचे?कि," कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा"?
याचं जाहिरातीचं भरपूर विडंबन झालं.एका विडंबनात तर स्वःता मकरंद म्हणतो," आरं ये रताळ्या सह्याद्रीच्या टोकावरून बघ,जिथं होता तिथंच आहे.महाराष्ट्र माझा.माञ पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलयं.आता वास्तवात मकरंदलाच प्रश्न पडलाय,कि, " कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा "?
दादासाहेब फाळकेच्या रंगभूमीशी नातं सांगणार्या या दोघाची खरीखुरी
'भूमिका' संपन्न व्हावी.समाजाला त्याची संवेदना मिळावी.माझ्यातला 'माणूस' मलाच सापडावा.पुन्हा कुण्या माझ्या बळीराजा भावाला 'दोरखंड' जवळचं वाटू नये.म्हणून आपल्या परिनं जे-जे काही शक्य आहे. ते आपण सगळे करूयात त्यामुळेचं हा लेखनप्रपंचं होय......
शेवटी न राहावून... आमच्या लाडक्या कवी मिञाच्या.....म्हणजेच...नितीन चंदनशिवेच्या दोन ओळी आठवताहेत तो लिहतो.......
"बांधावरीची बाभळीसुध्दा
 आता गद्दार झालीय.....
तिनही कुणब्याचा जीव घेण्यासाठी
एक फांदी जपून ठेवली आहे.....
फांदीला जेव्हा कुणब्याचं
शरीर लटकत असतं,
तेव्हा बुजगावण्या शिवाय तिथं
रडणारं दुसर कुणीचं नसतं,
सरकारचं डोक ठिकाणावरआहे का?
असं म्हणणारा ' लोकमान्य'
पुन्हा येईल का?
अन् ज्यांच्या राज्यात एकही
'शेतकरी' मेला नाही?असा...
 "शिवबा" पुन्हा जन्म घेईल का?"
                धनंजय झोंबाडे.
                 पुणे.
प्रिय मिञांनो या नव्या जगात आजपासून आपली रोजचं भेट होणार आहे...धन्यवाद!!